

Ujjwal Nikam to Represent Prosecution in High-Profile Hundiwale Murder Case
Sakal
-योगेश फरपट
अकोला : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणीची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणातील अंतिम युक्तिवादास सुरुवात होणार आहे. राज्य सरकारतर्फे नियुक्त विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम सरकारी पक्षाची बाजू मांडणार असून, त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. राजेश्वर देशपांडे व ॲड. नरेंद्र धूत सहाय्य करणार आहेत.