तलवारी घेऊन युवकाचे थिरकणे पडले महागात; १० व्यक्तींवर गुन्हा

हातात तलवारी घेऊन नाचणार्‍या तिघांसह एकूण 10 व्यक्तींवर बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 Crime
CrimeSakal

बुलडाणा : शहरातील क्रांती चौकात साउंड लावीत हातात तलवारी घेऊन नाचणार्‍या तिघांसह एकूण 10 व्यक्तींवर बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना 20 फेबु्रवारीला रात्री 8.30 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी एएसआय माधव पेटकर यांनी दिलेल्या तक्रारीत, लखन सुनील साठे, पवन सुनील साठे (दोघे रा. क्रांतीनगर), सुनील उर्फ लेमन संजय काळे (रा. भीमनगर), अमित सुनील बेंडवाल (रा. वॉर्ड क्रमांक 2), निशांत श्रीवास्तव (रा. क्रांतीनगर) व इतर 8 ते 10 युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Akola Region Crime News)

काही युवक क्रांतीनगर चौकात सार्वजनिक ठिकाणी स्पीकर लावून नाचत असून, त्यातील तिघाकडे हातात तलवारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर उपनिरीक्षक दिलीप पवार, एएसआय माधव पेटकर, पोहकॉ पंजाबराव साखरे, पोहेकॉ दत्तायत्र नागरे, पोहेकॉ सुनील जाधव, पोकॉ उमेश घुबे, चालक पोहेकॉ रमेश वाघ यांनी घटनास्थळी पोचून सदर प्रकरणी कारवाई केली. अधिक तपास पीएसआय नीलेश लोधी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com