
Ladki Bahin Yojana
sakal
अकोला : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअतंर्गत लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आल्यानंतर लाभार्थी लाडक्या बहिणी ‘केवायसी’साठी सेतू केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, ई-केवायसीसाठीचे संकेतस्थळ काम करत नसल्याने बहिणी टेंशनमध्ये आल्याचे चित्र आहे. सेतू केंद्रावर पोहोचणाऱ्या बहिणींना केवायसी होत नसल्याने माघारी परतावे लागत असून, मानसिक त्रास हेात आहे.