
अकोला : तीन जिल्ह्यातून सात दुचाकी केल्या लंपास
अकोला : वाशीम, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातून सात मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखरे जाळ्यात अडकविले. सात मोटारसायकल जप्त करीत चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोला शहर व जिल्हा परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाढत असलेला मोटारसायकल चोरीचा आलेख लक्षात घेता या घटनांना गांभिर्याने घेत पोलिस अधीक्षक जी.श्रीधर व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संतोष महल्ले व अधिकारी व कर्मचारी यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा: आजचे राशिभविष्य - 7 डिसेंबर 2021
त्यानुसार शनिवार, ता. ४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीवरून गजानन भास्करराव अवचार (वय ३१) रा.गुरुवार पेठ, ता.पातुर जि.अकोला ह.मु.महान ता. बार्शीटाकळी यास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथे आणून विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने आतापर्यंत एकूण सात मोटारसायकल या अकोला, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात.
यांनी आणला गुन्हा उघडकीस
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोउपनि. मुकुंद देशमुख, दत्तात्रय ढोरे, हसन शेख, विशाल मोरे, रवी पालीवाल, श्रीकांत पातोंड, संदिप टाले, स्वप्ना काशिद, दिलीप पवार, विजय कबले, रोषण पटले, सतिश गुप्ता, सुशिल खंडारे, सायबर पोलिस स्टेशन येथील गोपाल ठोंबरे व गणेश सोनोने यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
हेही वाचा: राजकारणाचे ‘प्रादेशिक’ गणित
या ठिकाणी होते गुन्हे दाखल
बार्शीटाकळी पोलिस स्टेशन : कलम ३७९ भा.दं. वि.
बार्शीटाकळी पोलिस स्टेशन : कलम ३७९ भा.दं.वि.
पातुर पोलिस स्टेशन : कलम ३७९ भा. दं.वि.
दिग्रस पोलिस स्टेशन (जि. यवतमाळ) : कलम ३७९ भा.दं.वि.
मानोरा पोलिस स्टेशन (जि.वाशीम) : कलम ३७९ भा.दं.वि.
Web Title: Lampas With Seven Two Wheelers From Three Districts
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..