Goods-carrying Gypsy crashes into a house
sakal
बार्शीटाकळी (जि. अकोला) - जागेच्या वादातून सुरू असलेल्या भांडणाला शुक्रवारी (ता. ११) सकाळी अचानक हिंसक वळण मिळाले. धाबा पोलिस चौकीअंतर्गत येणाऱ्या जामवसू येथे मालवाहू जिप्सी वाहनाने एका घराला दोन ते चार वेळा धडक दिल्याने घरातील सोमीबाई मखराम जाधव (वय ७०) यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.