अकोला : बायोडिझलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री!

इंडस्ट्रियल ऑईल वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यास शासनाची परवानगी
अकोला : बायोडिझलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री!
अकोला : बायोडिझलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री!sakal

अकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बायोडिजेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे इंडस्ट्रियल ऑईल वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यास शासनाची परवानगी नसून, असे अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, वाशीम-अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसीएशन अकोला यांनी निवेदन देऊन जिल्ह्यात अवैध बायोडिझेलची विक्री होत असल्याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार तहसिलदार, निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, निरीक्षक (वैधमापन) यांचे तालुकानिहाय पथक स्थापन करून काही बायोडिजेल विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली व नमुन्यांची पडताळणी करून अहवाल सादर करण्यात आला. अहवालानुसार, तपासण्यात आलेला नमूना बायोडिझेल नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बायोडिझेल विक्री केंद्रावरून कोणतीही व्यक्ती वाहनांना थेट इंधन म्हणुन बायोडिझेलची विक्री करता येणार नाही.

अकोला : बायोडिझलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री!
जालना : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

औद्योगिक वापरातील इंधनाचीही अवैध विक्री

जिल्ह्यात औद्योगिक वापराकरिता इंधन, असे फलक लावून अवैध विक्री केंद्र सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. तथापि, बायोडिझेल नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलचा (औद्योगिक उपकरणाकरिता उपयोगी असलेल्या उत्पादन) वाहनामध्ये उपयोग करू नये. इंडस्ट्रियल ऑईल हे कोणत्याही वाहनाकरिता इंधन म्हणून वापर करण्यास शासनाची परवानगी नाही. त्यामुळे हे तेल वाहनाकरिता इंधन म्हणून अधिकृत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अवैध विक्री करणाऱ्यावर कारवाई होणार

या संदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अनाधिकृत बायोडिझेल केंद्र चालवत असल्याचे आढळून आल्यास, तशी तक्रार संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात येथे करावी. या तक्रारीच्या चौकशीअंती तथ्य आढळल्यास किंवा तसे निष्पन्न झाल्यास संबंधिताविरूध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले. बायोडिजेलची अवैध विक्री करतांना कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास अशा व्यक्ती विरुद्ध जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ , ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com