Akola Mahavikas Aghadi
Akola Mahavikas Aghadisakal

Loksabha Election : अकोल्यात लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीने फुंकले रणशिंग

अकोला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, जि. प., पं. स., मनपा, न. पा आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले.

अकोला - अकोला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, जि. प., पं. स., मनपा, न. पा आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, सपा व अन्य घटक पक्ष्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुक नियोजन बैठक शुक्रवारी स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या सभेत सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. सभेचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर यांनी करीत आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांनी आपल्या मनोगतात लोकसभेसाठी आपल्या पक्षांनी केलेल्या तयारीची माहिती दिली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे यांनी महाविकास आघाडी ही या निवडणुकीत भाजपचा स्पेशल पराभव करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उबाठाचे जिल्हाध्यक्ष आ. नितीन देशमुख यांनी भाजप शिवसेनेच्याच भरोशावर सत्तेत येऊन आता भाजप निवडून येऊ शकणार नसून महाविकास आघाडीचा उमेदवार यावेळी लोकसभेत प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश तायडे यांनी महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राज्यात भाजपचा सपेशल सातत्याने पराभव होत असल्याचे सांगितले.

यात पदवीधर निवडणुकीत ज्याप्रमाणे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तोच कित्ता आता लोकसभेत महाविकास आघाडी गिरवणार असल्याचा दावा केला. या नियोजन बैठकीत काँग्रेस नेते साजिदखान पठाण यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत आता अल्पसंख्याक समाज ताकतीनिशी आघाडीच्या पाठीमागे उभा असून भाजपला धडा शिकवणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष रफिक सिद्दिकी, माजी अध्यक्ष युसुफ अली, माजी आ गजानन दाळू गुरुजी, माजी आ. हरिदास भदे, डॉ. अभय पाटील, प्रा. विश्वनाथ कांबळे, खोरीपाचे दिगंबर वाकोडे आदींनीही आपले मनोगत व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी संयुक्त संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात महिला दिनाचे औचित साधून महिला नेत्या डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. आशाताई मिरगे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजाताई काळे, सुषमा कावरे, देवश्री ठाकरे, ज्योत्स्ना चोरे यांनी पण आपले विचार व्यक्त करीत परिवर्तनाच्या या लढाईत मातृशक्ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी चंग बांधणार असल्याचा निर्धार केला.

बैठकीत अनेकांनी याप्रसंगी राज्यातील भाजपची महायुती व केंद्रातील भाजपचे मोदी सरकार यांच्या कार्यक्षमतेचा पाढा वाचला. यावेळी महाविकास आघाडीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सुत्रसंचालन कपिल रावदेव तर आभार महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी मानले.

या बैठकीला माजी आ.संजय गावंडे, सेवकराम ताथोड, अविनाश देशमुख, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, रमेश हिंगणकर, विवेक पारस्कर, प्रमोद डोंगरे, आनंद वानखडे, राजेश मिश्रा, राहुल कराळे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष इब्राहिम खालीक समवेत काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व अन्य घटक पक्षाचे समस्त शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com