

Labourers Returning After Cotton Picking Meet with Tragedy
Sakal
अकोला : कापूस वेचून घरी परतणाऱ्या मजूरांचे वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ मजूर गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता घुसरनजीक घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.