

Deputy CM Eknath Shinde
अकोल्यात शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिला. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. गत विधानसभा निवडणुकीआधी तिकिटासाठी सिरस्कर यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला होता. आत त्यांनी शनिवारी पुन्हा नागपुरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.