
अकोला : मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचा शाेध घेण्यात येत आहे. त्यामुळे पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अर्जदारांचे धाबे दणाणले आहे. तसेच जिल्ह्यात पात्र ४ लाख ३७ हजार ६२५ पैकी तब्बल ४० हजार ६०४ अर्जदारांच्या लाभाला विविध करणांस्तव ब्रेक बसला आहे. ब्रेक बसलेल्या अर्जदारांच्या तपासणीनंतर लाभ सुरू करायचा की नाही, याबाबतचा निर्णय शासनस्तरावरून हाेणार आहे.