Maharera Training : इस्टेट एजंट्स महारेरा प्रशिक्षण उपक्रम कौतुकास्पद!

रिअल इस्टेट एजंट्स व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी ‘महारेरा’ने एजंटना प्रशिक्षण, नोंदणी अनिवार्य केली आहे.
Maharera Tranning
Maharera Tranningsakal

अकोला - रिअल इस्टेट एजंट्स व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी ‘महारेरा’ने एजंटना प्रशिक्षण, नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यानुसार ‘एसआयआयएलसी’ व ‘नरेडको’च्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले.

एजंट प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या बॅचच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. महारेराच्या निर्देशानुसार ‘नरेडको’ अकोला आणि ‘एसआयआयएलसी’ संयुक्त विद्यमाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या कृषक भवन येथे चार दिवसात ११० एजंटना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोमवारी प्रथम बॅचचा समारोप झाल्यानंतर एजंटना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

यावेळी नरेडकोचे अध्यक्ष सुनील इन्नानी, सचिव दिलीप चौधरी, उपाध्यक्ष अविनाश राऊत, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश कृपलानी, सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे पदाधिकारी पंकज कोठारी, एसआयआयएलसीचे अभिषेक इनामदार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वरील मान्यवरांसह ‘नरेडको’चे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मालानी, रमाकांत खेतान, सुरेश माहेश्वरी, सोहेल खान, कुशल जैन, राजेश लोहिया, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. मंगळवारी सकाळी दुसऱ्या सत्राचे उद्‍घाटन मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. महारेराच्या निर्णयानुसार प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल त्यांनी ‘एसआयआयएलसी’ व ‘नरेडको’, अकोला युनिटचे कौतुक केले.

ग्राहकांची फसवणूक होणार नाही, एजंटला नोंदणी करून वैधानिक दर्जा प्राप्त होईल, व्यवहारात पारदर्शकता येईल यादृष्टीने सदर प्रशिक्षण नोंदणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक सुविधांवर ताण येणार नाही.

शहराचा सर्वांगीण विकास सुनियोजित होईल, यादृष्टीने बिल्डर्स, एजंट्स यांनी सहकार्य करावे, आपण मनपा प्रशासनाच्या वतीने सर्वच बांधकाम व्यावसायिकांना सहकार्य करण्यास सकारात्मक असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केल. एजंट्स प्रशिक्षण कार्यक्रमास अकोला, बुलडाणा, वाशीम येथील एजंटनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘नरेडको’ अकोला युनिटचे अध्यक्ष सुनील इन्नाणी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी उपस्थित एजंटना सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बिल्डर्स आणि एजंटनी काम करावे असेही त्या म्हणाल्या.

‘एसआयआयएलसी’चे महारेरा प्रशिक्षक अभिषेक इनामदार यांनी प्रशिक्षिणाची धुरा सांभाळली. महारेराकडे नोंदणी बाबत एजन्ट, ब्रोकर यांना सक्षमता प्रमाणपत्र, त्यासाठी लागणारे २० तासाचे प्रशिक्षण दिले.

सदर प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी ‘नरेडको’च्या अकोला युनिटचे पदाधिकारी उपाध्यक्ष अविनाश राऊत, सचिव दिलीप चौधरी, विदर्भ उपाध्यक्ष पुरुषोत्तम मालानी, मार्गदर्शक पंकज कोठारी, सुरेश माहेश्वरी, विठ्ठल सरप, रमाकांत खेतान, रामप्रकाश मिश्रा, सोहेल खान, अक्षय ठोकळ, कुशल जैन,अंकित अग्रवाल, अनुराग अग्रवाल, निखिल ठाकूर, संजय तुलशान, राजेश लोहिया, सीए हेमंत अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.

‘नरेडको’ व ‘एसआयआयएलसी’तर्फे राबविण्यात आलेला उपक्रमाने रिअल इस्टेट क्षेत्रात एक विश्वासाची सेतू निर्माण करण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना विश्वावपूर्ण सेवा देण्याचा हा प्रयत्न असून, नरेडको असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविणार आहे.

- सुनील इन्नाणी, अध्यक्ष, ‘नरेडको’ अकोला युनिट

रिअल इस्टेट क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या माझ्यासारख्या एजन्टकरिता ‘नरेडको’ व ‘एसआयआयएसली’ यांच्या मार्फत देण्यात आलेले प्रशिक्षण खूपच उपयुक्त आहे. यातून अनेक तांत्रिक बाबी समजून घेता आल्यात. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना त्याचा चांगला फायदा होणार आहे.

- रविंद्र ठाकरे, प्रशिक्षक, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com