- श्रीकांत राऊत
अकोला - काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये बहुतांश जागांवर एकमत झाले असून, शनिवारी अधिकृतपणे आघाडीची घोषणा होणार आहे. काही मोजक्या जागांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर सहमती झाल्याने आघाडीच्या चर्चांना निर्णायक वळण मिळाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात रंगत वाढली आहे.