अरे बापरे! कोरोनाचा जूनमध्ये वाढला कहर; 12 दिवसांत 26 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

अकोल्यात सात एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. या महिन्यांत १५ ते १६ रुग्णसंख्या होती.

अकोला : जून महिना उजाडला आणि कोरोनाचा रुद्र अवतार दिसणे सुरू झाला आहे. १० ते २३ जूनपर्यंत तब्बल २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हे प्रमाण अकोलेकरांच्या चिंतेत भर पाडणारे असेच आहे.

अकोल्यात सात एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. या महिन्यांत १५ ते १६ रुग्णसंख्या होती. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे च्या सुरुवातीला रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. आता जुनमध्ये ही रुग्णसंख्या गुणाकार करीत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून, एका आत्महत्येसह ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १० ते २२ जुन दरम्यान २६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे.

असे झाले मृत्यू
तारीख संख्या
२१ जून २
२० जून ५
१९ जून १
१८ जून २
१७ जून ००
१६ जून ०३
१५ जून ०२
१४ जून ०५
१३ जून ०२
१२ जून ०१
११ जून ०१
१० जून ०२
१२ दिवस २६ मृत्यू

वृद्धांचे प्रमाण अधिक
मृत्यू झालेल्यांमध्ये वयोवृद्धांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. ६० ते ७० वर्ष वयोगटातील नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला असून, या वृद्धांनी वेळेवर येऊन उपचार घेतले असते तर त्यांचेही प्राण वाचले असते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As many as 26 people died due to corona virus in akola district