Maratha Resevation : पालकमंत्री, मंत्र्यांना कार्यक्रमाला बाेलवू नये; कार्यक्रम उधळून लावू

मराठा आरक्षणासाठी गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
akola
akolasakal

अकोला - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपाेषणाच्या पार्श्वभूमीवर साेमवारी गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्री, पालकमंत्री यांना काेणत्याही शासकीय व अशासकीय कार्यक्रमाला बोलावू नये, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

जालना जिल्ह्यात जरांगे पाटील यांचे उपाेषण सुरू आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अकोला जिल्ह्यातही रविवारी (ता.२९) बैठक घेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्यानुसार सोमवार, ता. ३० ऑक्टाेबर राेजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेण्यात आली. त्यांना निवेदन सादर करून पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. यावेळी माेर्चाचे समन्वयक डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, विनायकराव पवार, कृष्णा अंधारे, प्रदीप चोरे, धनंजय दांदळे, शंतनू वसू, सुनिता ताथोड, संजय सूर्यवंशी, श्रीकांत प्रफुल्ल देशमुख, प्रदीप लुगडे, गणेश गिराम, धीरज देशमुख, काशिनाथ पटेकर, माधुरी वाघमारे, रश्मी पटेकर, डॉ. अमोल रावणकार, अनुराधा ठाकरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या

मनाेज जारांगे पाटील यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार शासनाकडून करण्यात यावेत.

जीविताला धोका झाल्यास पूर्ण जबाबदारी शासनाची राहणार आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी.

अकाेला जिल्ह्यात मंत्री यांना जिल्हा बंदी तर आमदारांना गाव बंदी करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत जिल्ह्यात येऊ नये, अन्यथा त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्यात येतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्री आणि पालकमंत्री यांना काेणत्याही शासकीय व अशासकीय कार्यक्रमाला बोलावू नये.

akola
Maratha Reservation : सरकारवर दबाव! तीव्र लढा, प्रकृतीची चिंता... लक्ष्य मात्र आरक्षण

हरणे यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा; आमदारांनीही दिली भेट

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गजानन हरणे यांच्या अकोला येथील अन्नत्याग सत्याग्रहाला वाढता पाठिंबा आहे. विविध संघटनांनी भेट घेवून जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार नितिन देशमुख, माजी मंत्री दशरथ भांडे, जि.प.अध्यक्षा संगिता अढाऊ आदींनी भेट देवून आंदोलकांचे म्हणणे शासनाकडे मांडण्याचे आश्वासन दिले.

त्यासोबतच विविध संघटनांनीही आंदोलन स्थळी भेट देवून पाठिंबा दिला. त्यात धनगर समाजाचे युवक आघाडीचे अध्यक्ष विशाल दिवनाले, सह्याद्री मराठा संघटनेचे मकरंद पाटोळे, जिजाऊ ब्रिगेडचे इंदूताई देशमुख, जिल्हाध्यक्ष रेणू गावंडे, कार्याध्यक्ष मृदुला गावंडे, सीमा तायडे, प्रतिभा मते, सुरेखा राऊत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिलीप जगताप, शेतकरी जागरमंचचे प्रशांत गावंडे, काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी शिवसेना तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, अशा विविध सामाजिक संघटनांचा समावेशआहे.

akola
Maratha Reservation: शपथ घेतली आहे ना; आता काही करा, पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

आमदार रणधीर सावरकर यांच्या समक्ष उपोषणकर्ते गजानन हरणे यांच्या पत्नी सौ युगा यांनी आपली गाऱ्हाणी व समस्या मांडल्या. आरक्षणा अभावी झालेल्या नुकसानीचा पाढा वाचला व आपला संताप व्यक्त केला. दिवसभर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी मंडपाला भेट देऊन घोषणा दिल्यात. यामुळे परिसर घोषणांनी परिसर निनादून गेला होता. सकाळी गजानन हरणे यांची वैद्यकीय तपासणी केली असता शुगर लेवल कमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com