MLA Randhir Savarkar Raises Serious Issue in Winter Session
sakal
अकोला
Akola News : अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावर विधानसभेत तीव्र संताप; सेंट अॅन्स शाळेची मान्यता रद्द करण्याची आ. रणधीर सावरकर यांची मागणी!
Randhir Savarkar : अल्पवयीन मुलीच्या त्रासाच्या गंभीर प्रकरणी रणधीर सावरकर यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
अकोला : शहरातील गीता नगर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने संपूर्ण समाज हादरून गेला असून, या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज (१० डिसेंबर २०२५) मुख्य प्रतोद आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा अत्यंत गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

