
बुलडाणा शहराची हद्द वाढावी व आसपासच्या गावांना शहरांमध्ये सामावून घ्यावे, असा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आपण पुढाकार घेऊन या प्रस्तावाला चालना दिली असून नगर विकास विभागामार्फत या प्रस्तावामध्ये या त्रुटी दूर करून तो आता अंतिम टप्प्यात आला असल्याने आगामी काळात लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन शहराची हद्द वाढणार आहे.
बुलडाणा : बुलडाणा नगरपालिकेत समाविष्ट करावयाच्या आसपासच्या गावाबाबतच प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला मान्यता मिळेल, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान मतदारसंघातील प्रश्नांबाबत श्री. गायकवाड पत्रकारांशी बोलत होते. बुलडाणा शहराची हद्द वाढावी व आसपासच्या गावांना शहरांमध्ये सामावून घ्यावे, असा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आपण पुढाकार घेऊन या प्रस्तावाला चालना दिली असून नगर विकास विभागामार्फत या प्रस्तावामध्ये या त्रुटी दूर करून तो आता अंतिम टप्प्यात आला असल्याने आगामी काळात लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन शहराची हद्द वाढणार आहे. त्यामुळे पर्यायाने नगर पालिकेच्या उत्पन्नात भर पडून परिसरातील गावांमध्ये ही विकास कामे व सुविधा पोचविता येणार आहेत. वास्तविक पाहता बुलडाणा शहराचा विस्तार वाढत असताना आसपासच्या सागवान, सुंदरखेड, येळगाव, माळविहीर, जांभरून, सावळा व हनवतखेड या गावांच्या सीमा शहराला टेकल्या आहेत.
हे ही वाचा : मुलाने केली पित्याची हत्या ; चिंचखेड खुर्द येथील घटना
सुंदरखेड, येळगाव, सागवान, माळविहीर, जांभरून, हनवतखेड या परिसरात अनेक मोठमोठी बांधकामे, फ्लॅटस्कीम तयार झालेले आहेत. वास्तविक पाहता ही सर्व जागा शहराला लागून असल्याने व परिसरातील नागरिक सगळ्या सुविधा घेत असल्याने सर्व सुविधा नागरी परिसरातल्या परंतु कर मात्र ग्रामपंचायतीचा अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. आगामी काळात या सर्व ग्रामपंचायती बुलडाणा शहरामध्ये समाविष्ट झाल्यास नगरपालिकेची हद्द वाढून आणखी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार असल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले