सहा वर्षापासून मुक्ता करतीय लोढाई मातेच्या पाय-यांची स्वच्छता

महादेव घुगे
Sunday, 18 October 2020

मुक्ता कांबळे हिने आपले मागील सहा वर्षापासूनचे मंदिरातील सुमारे 140 पाय-यांची स्वच्छता करण्याचे व्रत आजही अविरत सुरू ठेवले आहे.

रिसोड (वाशीम) : नवरात्र उत्सव हा ख-या अर्थाने जगदंबेच्या नव रूपांचे पूजन करण्याचे आहे. परंतु रिसोड तालुक्यातील वाडी शेतशिवारातील मुक्ता गणपत कांबळे ही विद्यालयीन शिक्षण घेणारी युवती मागील सहा वर्षापासून नित्य नित्यनेमाने नवरात्र उत्सवामध्ये परिसरातील शेकडो फुट उंच असलेल्या लोढाई माता मंदिराच्या सुमारे 140 पाय-यांची स्वच्छता करीत आपले देवी प्रती व्रत जोपासण्याचे विधायक कार्य करते.

हे ही वाचा : शिरपूरचे जागृत व प्रख्यात देवस्थान श्री आई भवानी संस्थान

नवरात्र उत्सवामध्ये नारी शक्तीचा उदोउदो करण्याचा उत्सव त्यामुळेच नवरात्र दरम्यान प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या रंगाची साडी चोळी परीधान करीत उपवास व्रत करणे. दांडीया-गरबा खेळून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा. परंतु मागील सात महिन्यापासूनकोरोना विषाणू संसर्गाचा प्रकोप रोखण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाऊन घोषीत केला. यामुळे बहुतांश सण-उत्सवांवर सुध्दा बंदी लादण्यात आली. तरी सुध्दा अनेक ठिकाणच्या महिला नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतांना दिसतात. परंतु रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील अल्प भुधारक कुटुंब प्रमुख गणपत कांबळे यांच्या परिवारातील पाच मुली व पाच मुले असा बराच मोठा परिवार गणपत कांबळे हे सतत मुलापेक्षा ही मुलींचे लाड पुरविणारे आहे.

हे ही वाचा : रस्त्यावरील फलकामुळे वाहन धारकात संभ्रम

सततच्या पावसाने शेतातील उभे पिक पूर्णपणे नेस्तनाबुत झालेले आसतांना आपल्या परिवाराला कोणत्याच गोष्टीची अडचण भासनार नाही याची सतत दक्षता घेतात. परंतु मुक्ता कांबळे वय 14 वर्षे या मुलीने आपल्या कुटुंबाला ना आवडणारा असा कुठलाच अट्टाहास न धरता देवी देवतांचे नवरात्र उत्सवामध्ये व्रत करण्यासाठी एक विधायक पाऊल उचलले. परीसरातील लोढाई माता मंदिर येथे विजया दशमीच्या एक दिवस आधी हजारोच्या उपस्थित यात्रा उत्सव भरतो.

यावर्षी लाॅकडाऊनमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली. परंतु मुक्ता कांबळे हिने आपले मागील सहा वर्षापासूनचे मंदिरातील सुमारे 140 पाय-यांची स्वच्छता करण्याचे व्रत आजही अविरत सुरू ठेवले आहे. यामधून हलाखीच्या परीस्थितीमध्ये सुध्दा चांगल्या विधायक पध्दतीने नवरात्र उत्सव साजरा करण्याचा एक प्रकारे मुलमंत्र मुक्ता कांबळे या मुलीने नवरात्र उत्सवा दरम्यान दिला आहे.

मुक्ता कांबळे म्हणाल्या, नवरात्र उत्सवामध्ये नारी शक्तीचा आदर केला जातो. परंतु परीस्थितीच्या आवाक्या बाहेरील खर्च करून कुटुंबाला आर्थिक अडचणी मध्ये आणणारा नवरात्र उत्सव आम्हाला परवडनारा नव्हता. त्यामुळे देवीची भक्ती ही 140 पाय-यांची स्वच्छता करून करत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukta Kamble of Risod village has been cleaning 140 steps of Lodhai Mata Mandir for the last six years