नगरपरिषद निवडणुकीचे पडघम : तीन दिग्गजांच्या मैफिलीत भैरवी कोणाची?

नगरपरिषद निवडणुकीचे पडघम : तीन दिग्गजांच्या मैफिलीत भैरवी कोणाची?

वाशीम : गाण्याच्या मैफिलीत समापनाला राग भैरवी गायनाची प्रथा आहे. मात्र, तीन दिग्गजांचे सूर एकत्र येऊन सजलेल्या मैफिलीत शेवटची भैरवी कोणाची होणार? याचीच चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सद्या खासदारकी शिवसेनेकडे तर दोन आमदार भाजप व एक आमदार शिवसेनेकडे आहे. भाजप-सेनेच्या युतीच्या काळात आमदार-खासदार एकाच मंचावर ही बाब सामान्य होती, मात्र मागील विधानसभा निवडणुकीत युती आघाडीत बेबनाव झाला होता. (Municipal-elections-Bjp-Shivsena-Mp-Bhavana-Gawali-MLA-Lakhan-Malik-Former-MLA-Vijay-Jadhav-The-political-picture-will-change-Washim-Political-News-nad86)

एकत्र मंचावर बसणारे सगळ्याचं नेत्यांची तोंडे परस्परविरोधी दिशेकडे झाली होती. मात्र, या महिन्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, भाजपचे आमदार लखन मलिक, भाजपचे माजी आमदार विजय जाधव यांनी एकत्र येऊन वाशीम शहरातील जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘टेंपल गार्डन’ची चौकशी करण्याची मागणी केली. वरवर पाहता ही बाब सामान्य वाटत असली तरी मोठ्या ब्रेकनंतर हे तिन्ही दिग्गज एका विषयावर एकत्र येणे ही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

नगरपरिषद निवडणुकीचे पडघम : तीन दिग्गजांच्या मैफिलीत भैरवी कोणाची?
जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

‘टेंंपल गार्डन’ हा विषय तसा नगरपरिषदेच्या अखत्यारीतला विषय आहे. शिवसेनेचे अशोक हेडा नगराध्यक्ष आहेत. मात्र, वर्षभरात हेडा शिवसेनेच्या वर्तुळातून गायब झाले आहे. तसेच नगरपरिषदेत नगराध्यक्ष जरी शिवसेनेचे असले, तरी नगरसेवकांमध्ये भाजपचे बहुमत आहे. या बहुमतात काही अपवाद वगळता सर्व नगरसेवक भाजप आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्या गोटातील आहेत.

गत आठवड्यात भाजप आमदार लखन मलिक यांनी रस्त्यामधील खड्ड्याचा मुद्दा उपस्थित करून आंदोलन केले होते. या आंदोलनात दोन नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर भाजपचे माजी आमदार विजय जाधव यांनी ‘टेंपल गार्डन’चा मुद्दा उचलत पालिकेला अल्टीमेटर दिला आणि पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात खासदार भावना गवळी यांनी थेट चौकशीची मागणी आक्रमकपणे मांडून या राजकीय युतीचा ‘श्री’ गणेशा केला आहे. हे राजकारण सरळ वाटत असले, तरी भविष्यात नगरपरिषद निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात समर्थ पर्याय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगरपरिषद निवडणुकीचे पडघम : तीन दिग्गजांच्या मैफिलीत भैरवी कोणाची?
प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; भावाला दिली होती धमकी

ताई-भाऊंचे गुळपीठ कोणाचे जेवण करणार अळणी?

नगरपरिषद निवडणुकीत गतवेळी शिवसेना स्वबळावर रिंगणात होती. खासदार भावना गवळी यांनी घरोघर फिरून सत्ता खेचून आणली होती. यावेळी मात्र माजी आमदार विजय जाधव व आमदार लखन मलिक यांचा समन्वय कायम राहिला, तर आमदार राजेंद्र पाटणी यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. जुने शहर हा आमदार लखन मलिक व माजी आमदार विजय जाधव यांचा बालेकिल्ला राहिला आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांनी नऊ वर्षांपूर्वी शहर विकास आघाडी तयार करून निवडणूक लढविली होती तेव्हा त्यांना जुन्या शहरात एकही जागा निवडून आणता आली नव्हती. हा संदर्भ कायम राहिला, तर हे मनोमीलन जिल्ह्याचे राजकारण बदलणारे ठरणार आहे.

(Municipal-elections-Bjp-Shivsena-Mp-Bhavana-Gawali-MLA-Lakhan-Malik-Former-MLA-Vijay-Jadhav-The-political-picture-will-change-Washim-Political-News-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com