Nitin Gadkari : विकासाचा कार्यक्रम संयुक्तरित्या राबवून विदर्भ समृद्ध करा - नितीन गडकरी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : मूर्तिजापुरात राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण
murtizapur national highway road inauguration Vidarbha by implementing development program jointly Nitin Gadkari
murtizapur national highway road inauguration Vidarbha by implementing development program jointly Nitin GadkariSakal

मूर्तिजापूर : केवळ रस्ताच बांधला नाही, तर त्याच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल. उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या कार्यशाळेतून पशूखाद्य, फलोत्पादन झिंगे उत्पादन, गोट फार्मच्या धर्तीवर काऊ फार्म, मत्स्य व्यवसायादी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना सहकार्य करावे.

निश्चितपणे शेतकऱ्यांचा विकास होऊन विदर्भ सुखी, समृद्ध व संपन्न होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अमरावती ते कुरणखेड चौपदरी रस्त्याच्या ९१२ कोटी रुपये खर्चाच्या ५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे,

कुरणखेड ते शेळद रस्त्या (लांबी ५०.०० किमी किमत ८७२ कोटी)चे लोकार्पण व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१-सी वरील कारंजा-खेर्डा-मूर्तिजापूर रस्त्याचे (लांबी २६.०० किमी किंमत ५९४ कोटी) भूमीपूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

खा.भावना गवळी, खा.अनिल बोंडे, आ. हरीश पिंपळे, आ.रणधीर सावरकर, आ.राजेंद्र पाटणी, आ.प्रकाश भारसाकळे, आ.वसंत खंडेलवाल, आ. प्रताप अरसोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आशीष असाटी यांनी प्रास्ताविक केले. २४०० कोटीच्या कामांचे लोकार्पण व भूमीपूजन आपल्या मतदारसंघात करणाऱ्या ना.गडकरींच्या ऋणातून मुक्त होताच येणार नाही.

मात्र, त्यांनी आता रेल्वेमंत्री व्हावे, आशी अपेक्षा आ.पिंपळे यांनी व्यक्त केली. अकोल्यातील वाशीम बायपास वर फ्लाय ओव्हवर, एमआयडीसीतील अप्पू पॉईंटजवळ अंडरपास द्यावा तसेच क्रॉपींग पॕटर्नमध्ये बदल करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे, अशी आपेक्षा आ.सावरकर यांनी ना.गडकरींकडे व्यक्त केली.

आ.पाटणी, आ.भारसाकळे, आ.अरसड, खा.बोंडे, खा.गवळी यांचीही भाषणे झाली. मंत्री गडकरी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच स्व.आ.गोवर्धन शर्मा व आजारी आसल्यामुळे येऊ न शकलले खा.संजय धोत्रे यांची आठवण काढून या रस्त्यासाठी त्यांनी सातत्याने मागणी केल्यचे नमुद केले.

रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही

कारंजा रस्त्यावरील खड्डे दाखवून लोकांनी चंद्रयानाचा उल्लेख करीत हे चंद्रावरील खड्डे आसल्याचे सांगून माझे १०० किलो वजन तसूभरही कमी होऊ दिले नसल्याचा आ.पिंपळेंच्या भाषणातील उल्लेखाचा धागा पकडून ना.गडकरींनी,

आता हा रस्ता झाल्यानंतर ५० वर्षे त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. त्यामुळे दीडशे किलो वजन होऊ देऊ नका व ‘चंद्र वाढतो कलेकलेने हरीश वाढतो किलोकिलोने’, असे म्हणण्याची पाळी आमच्यावर आणू नका, अशी मखलाशी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

कोलकात्यापासून सुरू होऊन गुजरातपर्यंत जाणाऱ्या या सात हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून, आज दोन पॕकेजचे लोकार्पण झाले. ता. १५ जानेवारीपर्यंत पूर्णतः पूर्णत्वास जाईल, असे ना. गडकरी यांनी जाहीर केले.

अकोट ते अकोला रस्त्याचे काम चार महिन्यात

शेगाव ते देवरी फाटा रस्त्यावरील पूर्णा नदीवरील पुलासाठी १०० कोटी रुपये, गांधीग्रामच्या पुलासाठी ७० कोटी मंजूर करण्याची घोषणा गडकरींनी यावेळी केली. अकोट ते अकोला रस्त्याचे काम तीन-चार महिन्यात पूर्ण करण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा, मात्र चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे सांगून गडकरींनी ईन्फ्रा व इगल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मंचावर बोलावून त्यांना प्रमाणपत्र दिले.

असा होणार कारंजा-खेर्डा-मूर्तिजापूर रस्ता

भूमिपूजन होत असलेल्या या चौपदरी रस्त्याचे सिमेंट कॉक्रिट दुभाजकासहित बांधकाम २६.०८ किमी आहे. त्यात आठ लहान पूल, ३८ मोऱ्या, एक पथकर वसुली नाका, रस्त्याच्या दोन्ही बाजूस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम २५.२७६ किमी, संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड व कुंपण, पथदिवे ३.३५८ किमी, दहा प्रवासी निवारे आदींचे नियोजन आहे. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

या चौपदरी रस्त्यामुळे समृद्धी महामार्ग, तसेच तीन राष्ट्रीय महामार्ग, अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर ही शहरे जोडली जातील. या प्रकल्पांतर्गत अमृत सरोवर योजना राबविण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे अकोला व वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पूर्णत्वास जाणार आहे.

असा आहे अमरावती-कुरणखेड महामार्ग

अमरावती ते कुरणखेड टप्प्यात दोन मोठे पूल, ४८ कल्व्हर्ट, दोन वाहन भुयारी मार्ग, पाच पादचारी भुयारी मार्ग, दहा बस थांबे यांचा समावेश आहे. कुरणखेड ते शेळद टप्प्यात चार मोठे पूल, ५६ कल्व्हर्ट, ११ वाहन भुयारी मार्ग, चार पादचारी भुयारी मार्ग, दहा बस थांबे यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com