

Akola mysterious Killings and crime pattern raise serious concerns.
Sakal
अकोला : अकोला जिल्हा पुन्हा एकदा धक्क्यात आहे. महिनाभरात सलग दोन रहस्यमय हत्यांनी पोलिस यंत्रणेलाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला भयग्रस्त केले आहे. जुने शहरातील अक्षय नागलकरच्या गूढ हत्येची चर्चा अजून शमलीही नव्हती, तोच बाळापूर तालुक्यातील धनेगाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी युवतीचा मृतदेह समोर आला. जाळून मारण्याची समान पद्धत, अल्पावधीत उघडकीस आलेली दुसरी हत्या आणि मृतांची अद्याप ओळख पटत नसल्याने ‘गुन्हेगारीचे स्वरूप बदलतेय की कुणीतरी मालिका गुन्हेगार सक्रिय आहे?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांसमोर हे नवे कोडे असून तपासाची साखळी आणखी गुंतागुंतीची बनली आहे. या सर्व परिस्थितीकडे आजच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे.