esakal | Akola : पुढील २४ तास धोक्याचे
sakal

बोलून बातमी शोधा

Rainfall

Akola : पुढील २४ तास धोक्याचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : हवामान विभाग, नागपूर यांनी पुढील २४ तासामध्ये अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. यादरम्यान ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारा वाहण्याची शक्यता वर्तविलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा परिणाम आहे.

नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरू असताना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प १०० टक्के जलसाठा झालेला असुन सर्वच प्रकल्पामधुन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले आहेत.

loading image
go to top