Akola News : ‘ऑन ड्युटी’ नरनाळा महोत्सवाचा घाट; जनतेचे प्रश्न सोडवणार कोण, प्रशासनाचा बेताल कारभार

Narnala Mahotsav controversy : नरनाळा महोत्सव १५-१७ फेब्रुवारी आयोजित; कामकाजाचे दिवस असून प्रशासन ‘ऑन ड्युटी’मध्ये गुंतलेले. नागरिकांचे प्रश्न प्रलंबित, पाणी, रस्ते, आरोग्य, बेरोजगारीसारखे गंभीर मुद्दे दुर्लक्षित, प्रशासकीय निर्णयावरील संताप व्यक्त.
Narnala Mahotsav controversy

Narnala Mahotsav controversy

sakal

Updated on

अकोला : नरनाळा महोत्सवाच्या तारखा जाहीर होताच जिल्हा प्रशासनाच्या प्राधान्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. १४ फेब्रुवारी हा दुसरा शनिवार असल्याने प्रशासनाला नेहमीप्रमाणे सुटी असते. १५ फेब्रुवारी रविवार आहे, तेही मान्य. मात्र यानंतर थेट १६ व १७ फेब्रुवारी हे दोन्ही ऐन कामकाजाचे दिवस असताना महोत्सवाचा दुसरा व तिसरा दिवस ठेवण्याची ‘बुद्धी’ कुणाला सुचली, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com