esakal | Akola : महामार्गावरील अपघातातील अनोळखी जखमीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Akola: महामार्गावरील अपघातातील अनोळखी जखमीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोरगाव मंजू ‌(जि. अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणी रंभापुर नजीक 4 ऑक्टोंबर रोजी सोमवारी सकाळी दरम्यान एका अनोळखी इसमास मालवाहू ट्रकने धडक दिली होती. या अपघातात सदर इसम गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून जखमीस उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल केले होते. अखेर उपचारादरम्यान नागपूर येथे अनोळखी इसमाचा मंगळवारी मृत्यू झाला सदर इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन बोरगाव मंजू पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणी रंभापुर नजीक 4 ऑक्टोंबर रोजी मालवाहू ट्रक क्रमांक एम एच 40 बी जी 7929 या ट्रकने एका अनोळखी पादचाऱ्यास धडक दिली या अपघातात सदर इसम गंभीर जखमी झाला होता, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तर , जखमीस अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले होते, तर प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले होते.

हेही वाचा: NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

दरम्यान, बोरगाव मंजू पोलिसांनी सदर इसमास उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान अंजनी नागपूर येथे 5 ऑक्टोंबर रोजी सदर अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,तर ओळख पटेल असे पोलिसांना आढळून आले नाही, सदर इसम अनोळखी वय अंदाजे वय 35 वर्ष, बांधा मध्यम, उंची पाच,पाच,टक्कल पडलेली, अंगावर काळसर रंगाची फुल पॅंड, वरील वर्णन असलेल्या अनोळखी इसमाची ओळख पटली नाही, सदर इसमाचा मृतदेह शासकीय रुग्णालय नागपूर येथील शवागारात असुन ओळख पटली तर नातेवाईकांनी पोलिस ठाणे अंजनी नागपूर, बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन ठाणेदार सुनील सोळंके, हेडकॉन्स्टेबल सतेंद्र पंचवटकर, सुदिप राऊत यांनी केले आहे.

loading image
go to top