
मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर!
अकोला - महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेवतीने आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीचे अनुशंगाने इच्छुक उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जनसामान्यांचे प्रश्न घेवून निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यानी महानगरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अकोला संपर्क मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे अध्यक्षतेखाली केले होते. या प्रसंगी आगामी मनपा निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. लवकरच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याचे उद्देश्याशने नियोजन करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्यात.
या बैठकीला महानगराध्यक्ष विजय देशमुख, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, श्याम अवस्थी, मोहम्मद रफीक सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रा. विश्वनाथ कांबळे, कृष्णा अंधारे, प्रवीण कुंटे, सै. युसुफ अली, फैयाज खान, संतोष डाबेराव, मनोज गायकवाड, नितिन झापर्डे, उषाताई विरक, सुषमा निचळ, भारती निम, मंदाताई देशमुख, अब्दुल रहीम पेंटर, याकूब पठान, अजय रामटेके, दिलीप देशमुख, फरीद पहलवान, अफसर कुरैशी, नकीर खान,अजय मते,अब्दुल अनीस, देवानंद ताले आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन बुढन गाडेकर यांनी केले.
Web Title: Ncps Preparation For Municipal Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..