अकोटात रात्रीची संचारबंदी रविवारपर्यंत वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोल्यात रात्रीची संचारबंदी

अकोटात रात्रीची संचारबंदी रविवारपर्यंत वाढवली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला (अकोट) ः अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात १७ नोव्हेंबरपासून शुक्रवार १९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली होती. त्यात दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून, आता रविवार, ता. २१ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे.

त्याच प्रमाणे अकोट शहरातही आता रविवारपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली असून, दिवसा जमावबंदीचा आदेश कायम आहे. अकोटमध्ये नागरिकांपर्यंत संचारबंदीची माहिती निट पोहोचविण्यात महसूल व पोलिस प्रशासनात समन्वय नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.

पोलिस प्रशासनाने जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दोन दिवसाच्या संचारबंदी काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीनुसार अकोट शहरातील संचारबंदी वाढविण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी काढला. या आदेशानुसार ता.१९ ते २१ नोव्हेंबर या काळात रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरू राहतील. अकोट शहरातील जमावबंदी आदेश कायम आहे.

लोकप्रतिनिधी गायब

अकोट शहरात ता. १३ नोव्हेंबरपासून संचारबंदी आहे. या काळात कोणताही लोकप्रतिनिधी अकोट शहरात फिरकला नाही. आमदार, पालकमंत्री, स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही नागरिकांच्या मदतीसाठी बाहेर न पडल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

याबाबींचे पालन करा!

  • कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्माच्या दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करू नये.

  • जातील भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांद्वारे प्रसारीत करणार नाहीत.

  • आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही व समाज माध्यमांचा गैर वापर करणार नाहीत.

  • कोणत्याही प्रकारचे रॅली, धरणे, मोर्चाचेकिंवा कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

  • निवडणूक प्रचार संदर्भात काही कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी यांची वेगळ्याने परवानगी घेणे बंधनकारक राहील.

  • कोविड लसीकरणाचे सत्र पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

loading image
go to top