esakal | गोळीबार करून तिघांचा जखमी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शीटाकळीत गोळीबार; कापूस व्यवसायाच्या वादातून वाद; तिघे जखमी

गोळीबार करून तिघांचा जखमी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी (जि. अकोला) ः कापूस व्यवसाच्या आर्थिक स्वरूपाच्या वादातून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे गोळीबार करून तिघांना जखमी केले होते. या प्रकरणी अमरावती व बार्शीटाकळी येथील नऊ कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Nine accused arrested in Barshitakali shooting in Akola)

सोमवारी सायंकाळी बार्शीटाकळी येथील अ . साकीब अ . गफ्फार (१९) व शे . नदीम शे. मुनीर (२५ ) व रस्त्याने जाणारी एका महिला गोळीबारात जखमी झाले होते. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांनी तातडीने कारवाई करीत अमरावती व बार्शीटाकळी येथील आरोपींना जेरबंद केले.

यात बार्शीटाकळी येथील गुड्डू राज उर्फ वासीमोद्दीन कुत्बोद्दीन (रा. हलोपुरा), मोहम्मद खिजर, शेख अल्बखश, जिशान अहमद, अब्दुल हक्क, सैयद वसीम, सैफ अली, शाहबाझ अहमद, अब्दुल एजाज (सर्व रा.अमरावती) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भांदवि. कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १८८, ५०४ सह कलम ४/२५, ३/२४ शस्त्र कायद्यानुसार बार्शीटाकळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा: कोरोना निर्बंधांचा भंग करणाऱ्या ४० ऑटोचालकांवर गुन्हे दाखल

यातील आरोपींना पाच दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्ग दर्शनात पीएसआय अरुन मुंढे करीत आहेत. या प्रकरणातील जप्त करण्यात आलेल्या शस्त्राची माहिती तपासाच्या कारणामुळे देण्यात आली नाही. गावात सध्या शांतता आहे.

संपादन - विवेक मेतकर

Nine accused arrested in Barshitakali shooting in Akola