esakal | शिवसेनेसोबतचा कोणताही विचार नाही : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

शिवसेनेसोबतचा कोणताही विचार नाही : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : पाठीत खंजीर खुपसणाऱ्यां सोबत युतीचा विचारही मनात नाही. त्यामुळे सध्या तरी स्वबळावरच आगामी निवडणुका भाजप (BJP) लढविणार. माणूस आशेवर जगत असल्याने भविष्यात काहीही होऊ शकते. मात्र कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही, असे मत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी अकोला येथे व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबतच्या कोणताही विचार नाही असल्याचे सांगितले. शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळ त्यांच्यासोबत युतीचा कोणताही विचार नाही. सध्या तरी आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहे. कार्यकर्त्यांना मला लढायची की नाही ही द्विधा मनःस्थिती कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवायचे नाही. ही जागा संपवून त्यातून बाहेर काढायाचे आहे, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा: चार वर्षे, तिच तारीख; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंकडून सत्ता व्याजासह केली वसूल

पाच जिल्हे सोडून निवडणुका

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण झाल्याने पाच जिल्ह्यांत निवडणुक घेता येणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार इतर जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवून निवडणूक घेता येईल. मराठा समाजाला मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीचे चार वर्षे केले शोषण अन् ती झाली गर्भवती...

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सात महिन्यात हे काम केले होते. आताच्या सरकारला त्यासाठी चार वर्षे लागतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

loading image
go to top