आता नोकरी मागणार नाही, नोकरी देणार; तरुणाईचा कल उद्योगाकडे

Industry Akola.jpg
Industry Akola.jpg

अकोला : दिवसरात्र अभ्यास करायचा, शेकडो ठिकाणी अर्ज करायचे, फी आणि प्रवासभाड्यात लाखो रुपये घालायचे...मात्र शंभरापैकी एकालाच नोकरी मिळणार...बाकीच्यांचे ‘लगे रहो रे भाई’ एज बार होई पर्यंत...पुरे हा जीवनाचा खेळ खंडोबा...आता नोकरी मागायची नाही तर, नोकरी द्यायची...असाच काहीचा निर्धात करीत आता तरुणाई उद्योग, व्यवसायाकडे वळत आहे. आर्थिक पाठबळ देऊन सरकारही त्यांच्या विश्वासाला मजबुती देण्याचे काम करताना दिसत आहे.

वर्षोगणती नोकरी मिळविण्यासाठी मारामार, अभ्यास, स्पर्धा परीक्षेचे क्लासेस, पुस्तकांवर खर्च, नोकरी मिळेपर्यंत तणावयुक्त जीवन, शेजारी-पाजाऱ्यांचे टोमणे, नातेवाईकांचे शेकडो सल्ले, परीक्षेचा निकाल येईपर्यंत पालकांच्या मनाची घालमेल आणि शेवटी निराशा...नोकरी मिळाली तरी, तीन, चार आकडी पगारासाठी जीवनाचे अर्धे आयुष्य खर्ची घालायचे आणि नाही मिळाली तर, ती मिळविता मिळविताच अर्धे आयुष्य खर्ची व्हायचे. हा असाच तरुणाईचा जीवन प्रवास सुरू असतो. आता मात्र तरुणाई हळूहळू स्वतःच्या पायावर उभी होत आहे. त्यांचे ध्येय बदलत असून, उद्योग, व्यवसाय करण्याकडे कल वाढत आहे. जिल्ह्यात, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात हा बदल पाहायला मिळत असून, गृह उद्योगापासून ते लघू, मध्यम व मोठ्या उद्योगातही तरुणाईने मजल मारली आहे.

कोरोना बनले निमित्त
कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातला असून, भारतातही कोरोना रुग्णाचा आकडा लाखात गेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी जवळपास तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांच्या पगारात मोठी कपात झाली तर, अनेकांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत छोटा-मोठा व्यवसायच अर्थार्जनाचा मार्ग उरला. त्यामुळेच कदाचित युवा वर्गाचे ध्येय परिवर्तन होत असून, तो व्यवसाय, उद्योगाकडे वळत आहे.

केंद्र, राज्य सरकारचा आर्थिक सपोर्ट
युवांनी नोकरीपेक्षा उद्योग, व्यवसायाकडे वळावे, स्वतःला व देशाला त्यातून आर्थिक मजबुती प्रदान करावी, या हेतूने उद्योगाला प्राधान्य देत, केंद्र व राज्य सरकारद्वारे विविध योजना देण्यात आल्या आहे. त्यांचेद्वारे आर्थिक अनुदान, कर्जपुरवठा सुद्धा केला जात आहे. खास करून युवा वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 2015 पासून स्टार्ट-अप इंडिया ही योजना सुरू करून, हजारो तरुणांना उद्योगासाठी मदताची हात दिला आहे.  ‘कोरोना’ संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या 20 लाख 97 हजार 53 करोड रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्ये सुद्धा रोजगार, व्यवसाय, उद्योग यासाठी कोट्यवधी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com