
ट्रॅव्हल-दुचाकीच्या अपघातात एक ठार
मोताळा : भरधाव ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.४) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोताळा-बुलडाणा मार्गावरील खडकी फाट्यानजीक घडली.सविस्तर असे की, मोताळा तालुक्यातील निमखेड येथील पोलीस पाटील प्रेमसिंग राठोड व त्यांची पत्नी शीतल राठोड हे दाम्पत्य दुचाकीने (एम.एच. २८ ए.डी. १५६३) बुलडाण्याकडून मोताळ्याकडे येत होते. तर, चाणक्य ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (एम.एच. १९ सी.वाय. २९४९) ही गाडी प्रवासी घेऊन बुलडाण्याकडे जात होती.
दरम्यान, मोताळा-बुलडाणा मार्गावरील राजूर घाटाच्या पायथ्याशी खडकी फाट्यानजीक सदर ट्रॅव्हल्स व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील शीतल राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर, प्रेमसिंग राठोड हे गंभीर जखमी झाले आहे. जखमी राठोड यांना उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती.
Web Title: One Killed In Accident One Injured Motala Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..