One lakh has been stolen from a grocery shop in Motala city
One lakh has been stolen from a grocery shop in Motala city

किराणा दुकानात एक लाखाची चोरी; मोताळा शहरातील घटना, गुन्हा दाखल

Published on

मोताळा  (बुलडाणा) : येथील आठवडी बाजार चौकातील क्वालिटी किराणा दुकान फोडून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली. प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
मोताळा येथील रफिक खां नथ्थे खां (४२) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची आठवडी बाजार चौकात क्वालिटी किराणा दुकान आहे. रफिक खां हे बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या छतावरील टिनपत्र्याचा मागील बाजूने नटबोल्ट खोलून आत प्रवेश केला व दुकानातील झंडू बाम एक बॉक्स (किंमत १२ हजार ६०० रुपये), उंट बिडी चार बॉक्स (किंमत ७० हजार ५६० रुपये), शिवाजी बिडी एक बॉक्स (किंमत १८ हजार रुपये) असा एकूण एक लाख एक हजार १६० रुपयांचा ऐवज लंपास केला. रफिक खां यांनी गुरुवारी सकाळी दुकान उघडले असता, सदर प्रकार उघडकीस आला.

या घटनेमुळे परिसरातील व्यापार्‍यांमध्ये भीती पसरली आहे. मागील काही दिवसांपासून मोताळा शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथील सुरसंगम मोबाईल शॉप फोडून चोरट्यांनी तब्बल पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता. विशेष म्हणजे चोरट्यांनी मुख्य चौकातील दुकानांना लक्ष्य करून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. याप्रकरणी रफिक खां नथ्थे खां यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ मिलिंद सोनुने करीत आहेत. 

चोरटा सीसी कॅमेर्‍यात कैद
 
क्वालिटी किराणा दुकान फोडणारा एक चोरटा पाठीमागील शाह किराणाच्या सीसी कॅमेर्‍यात कैद झाला आहे. सडपातळ शरीर बांधा असलेला हा चोरटा दुकानाच्या पाठीमागून दोन चकरा मारताना दिसतो. त्यानंतर पोतडीत मुद्देमाल नेताना दिसून येतो. मध्यरात्री तीन ते सव्वा तीन वाजताचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे. यावरून पोलिसांना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास मदत मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com