तिहेरी अपघातात एकजण गंभीर जखमी

दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.
akola
akolasakal
Updated on

मूर्तिजापूर, (अकोल) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ हा महामार्ग नसून ‘मौत का कुंवा’ झाल्यासारख्या झाला असून, या महामार्गावर पडलेल्या मोठ-मोठे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना खड्ड्यातून मार्ग शोधत आपले वाहन कसेतरी चालावे लागत असल्याने सोनोरी जवळ असलेल्या अरुंद पुलावर ऑटो, दुचाकी व टाटा एस गाडीचा तिहेरी अपघात झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला तर, दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथून दूध घेऊन चांदूरकडे जाणारी गाडी क्र. एमएच-२७-बीएक्स-४८५८ ही अरुंद पूल क्रॉस करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो क्र. एमएच-३७-बी-३६६२ हा भाजीपाला घेऊन जाच असताना खड्डा चुकविण्याच्या नादात दोन्ही वाहने समोरासमोर धडकले. तेवढ्यात अकोलाकडून मूर्तिजापूरकडे जात असलेल्या दुचाकी क्र. एमएच-३०-एम-७५१८ ही पलटी झालेल्या टाटा एस गाडीखाली आल्याने दुचाकीस्वार दिलीप देवराव सदार (वय ५२, रा. शेलुवेतल) व टाटा एसचा चालक अक्षय मेहरे (रा. चांदूर), ऑटो चालक दुर्गेश (रा. काटेपूर्णा) हे जखमी झाले.

akola
Pimpri : अंगावरून मोटारीचे चाक गेल्याने नऊ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

यापैकी एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले. तर, इतराना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस व आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.