काटेपूर्णा धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक

काटेपूर्णा धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक

अकोला ः राज्यात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाल्याचा दावा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. परंतु जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नाही. येणाऱ्या काळात काही कारणास्तव मॉन्सूनची वाट विस्कटली तर ३० टक्क्यांपर्यंत पोहचलेला जिल्ह्यातील सर्वात मोठ्‍या काटेपूर्णा (महान) धरणांमधील पाणीसाठा तळाला पोहचून जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Only 30% water remaining in Katepurna dam)

वेळेपूर्वीच केरळात धडकल्यानंतर राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर राज्याच्या इतर भागांमध्ये मॉन्सून हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचा दावा सुद्धा हवामान खात्यातर्फे करण्यात आला होता. परंतु असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झाला नाही.

काटेपूर्णा धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक
इंग्रजी शाळा एकवटल्या; शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रावरून वादळ

आकाशात काळे ढग दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र जोरदार पाऊस होत नाही. काही ठिकाणी पाऊस अधून-मधून हजेरी लावतो. त्यामुळे पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. दरम्यान जून महिन्याचे १९-२० दिवस झाल्यानंतर सुद्धा अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काटेपूर्णा धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक
इंग्रजी शाळा एकवटल्या; शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रावरून वादळ



असा आहे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा
जिल्ह्यात सर्वात मोठ्या काटेपूर्णा धरणात ३०.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यानंतर वान प्रकल्पात ३३.७०, मोर्णा प्रकल्पात ३२.३४, निर्गुणात १५.०१, उमामध्ये १६.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या दिवसात पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या ही धरणे तळ गाठू शकतात.

Only 30% water remaining in Katepurna dam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com