Akola News : नवमतदारांना यादीत आगाऊ नाव नोंदविण्याची संधी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची पत्रकार परिषदेत माहिती
opportunity for new voters to register name in advance in list collector Ajit Kumbhar
opportunity for new voters to register name in advance in list collector Ajit Kumbharsakal

अकोला : वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवण्याची अट असली तरी आता १७ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आगाऊ अर्ज करता येणार आहे. संबंधित मतदाराचे १८ वर्षे पूर्ण होताच अर्ज करणाऱ्या नवमतदारांचे नाव यादीत येईल.

आतापर्यंत १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी १ जानेवारी हा पात्रता दिनांक असायचा. मात्र, आता भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारीबरोबरच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे मतदार नोंदणी पात्रता दिनांक उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत केले.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवला जातो.

२७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे.

प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केले.

उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्काराचे वाटप

मतदार यादीतली १८ ते १९ वयोगटातील नवमतदाराच्‍या नोंदणीचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा’चे वितरणही करण्यात येणार आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

सन् २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्‍वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

नोव्हेंबर महिन्यात विशेष शिबिरे

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्याच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्‍यामध्‍ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती याच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे, अशी माहिती सुद्धा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com