जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायांना घरघर ! कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन, मधुमक्षीकापालन योजनेपुरतेच

In order to develop farmers it is necessary to do agri-business
In order to develop farmers it is necessary to do agri-business
Updated on: 

अकोला : आर्थिक स्थैर्यासाठी तसेच शेतकरी विकास साधण्यासाठी, शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्‍यक असल्याचे शासकीय, प्रशासकीय व सामाजिक स्थरावर नित्य सांगितले जाते. मात्र, जिल्ह्यात कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळी-मेंढीपालन, मधुमक्षीकापालन, रेशीम शेती, संकरित गायी-म्हशी पालन इत्यादी शेतीपूरक व्यवसाय केवळ योजनेपुरतेच उरले असून, त्यांना वृद्धींगत करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

वर्षोगणती नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्यात शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असून, सातत्याने आर्थिक नुकसान सोसणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी केवळ पीक उत्पादनावर अवलंबून न राहता संकरित गायी-म्हशी पालन/दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळी-मेंढीपालन, मधुमक्षीकापालन, रेशीम शेती, शेतमाल प्रक्रिया उद्योग इत्यादी शेतीपूरक व्यवसाय करावे. आर्थिक स्थैर्यासाठी इतरांनी सुद्धा हे व्यवसाय उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून करावे, असा सल्ला शासनाकडून, तज्ज्ञांकडून दिला जातो. 

शेतकऱ्यांचा, नागरिकांचा पर्यायाने राज्याचा, देशाचा विकास साधण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध योजना राज्यसरकार तसेच केंद्रसरकार राबवित आहेत. परंतु, जिल्ह्यात मोजकेच लोक या योजनांचा प्रत्यक्ष व्यवसाय करून विकास साधण्यासाठी लाभ घेत आहेत तर, बहुतांश लोक केवळ योजनांतील अनुदान मिळविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शेतीपूरक व्यवसाय करतात. त्यामुळे अजूनपर्यंत जिल्ह्यात शेतमाल प्रक्रिया उद्योग, संकरित गायी-म्हशी पालन/दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळी-मेंढीपालन, मधुमक्षीकापालन, रेशीम शेती, वराहपालन, शहामृग पालन इत्यादी शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसीत झाले नाहीत. 

यामुळे जिल्ह्यात पूरक व्यवसाय पिछाडीवर 

- शासन/प्रशासनस्तरावर नियोजनाचा, पाठपुराव्याचा अभाव 
- अनुदान मिळविण्यापुरता नागरिकांचा योजनेतील सहभाग 
- प्रशासनाचे दुर्लक्ष, उदासिनता 
- योजनेंतर्गत भ्रष्टाचार, योजनांचा प्रचार-प्रसार करण्यास टाळाटाळ 
- पुरक व्यवसायांच्या माहितीचा अभाव 
- मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभाव 
- सार्वजनिक स्तरावर व्यवसाय वृद्धीसाठी लोकप्रतिनिधीकडून प्रयत्नांचा अभाव 

हे आवश्‍यक 

-  शासन/प्रशासनस्तरावरून योग्य मार्गदर्शन 
-  योजना राबविण्याचे योग्य नियोजन, पाठपुरावा 
-  योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी चोख बंदोबस्त 
-  शेतकरी/नागरिकांचा व्यवसाय करण्यासाठी उत्साह 
-  आर्थिक नियोजनातून व्यवसाय 
- बाजारपेठेची उपलब्धता किंवा उत्पादन खरेदीची शासनस्तरावरून शाश्‍वती 
-  उद्योग केंद्र, बँकांकडून योग्य मार्गदर्शन, सहकार्य 

पाणी, वीजेचा अभाव ठरतेय मुख्य अडचण 

कोणताही शेतीपूरक व्यवसाय करायचा झाल्यास त्यासाठी सर्वाधिक गरज राहते ती पाणी आणि विजेची. परंतु, शेतात नित्य पाणी व वीज उपलब्ध राहत नसल्याने जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com