esakal | Akola। बावीस वर्षांपासून पांगरी पंचायतराज व्यवस्थेबाहेर; रेकॉर्डवरून गावच गायब
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : बावीस वर्षांपासून पांगरी पंचायतराज व्यवस्थेबाहेर

अकोला : बावीस वर्षांपासून पांगरी पंचायतराज व्यवस्थेबाहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्याचे किंवा राज्याचे विभाजन झाल्यानंतर त्या जिल्ह्याच्या सिमा निश्चित केल्या जातात मात्र मंगरुळपिर तालुक्यातील पांघरी महादेव हे गाव गेल्या बावीस वर्षापासून वाशीम जिल्ह्य़ात समाविष्ट असूनही या गावात ना ग्रामपंचायत आहे ना हे गाव कोण्या ग्रामपंचायतशी जोडलेले आहे. त्यामुळे लोकशाहीची बाराखडी समजल्या जाणाऱ्या पंचायतराज व्यवस्थेपासून हे गाव वंचित राहिले आहे.

हेही वाचा: सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  

मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाला गेल्या वीस वर्षांपासून ग्रामपंचायत च नाही.ग्रामपंचायत मिळावी यासाठी वारंवार विविध स्तरावर मागणी करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याचे निषेधार्थ येथील ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे घेतला आहे.

या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. मागील 22 वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्याच विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. तेव्हा पांघरी हे गाव अकोला जिल्ह्यात होते. मात्र जिल्हा निर्मिती नंतर वाशिम ला जोडण्यात आले. मात्र तेव्हापासून पांगरी ला ग्रामपंचायतच नाही किंवा कोणत्या ग्रामपंचायत ला जोडले नाही. विशेष म्हणजे मंगरुळपीर तालुक्यात अतिशय दुर्गम भागांत पांगरी महादेव हे गाव गेल्या अनेक वर्षांपेक्षा वसलेले आहे.

हेही वाचा: समुद्रात मासेमारीला जात असताना नौका गाळात रुतली

या गावांतील सर्व रहिवासी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. त्यांच्याकडे शेतीही आहे. स्वत:ची घरे आहेत मात्र गावाची ओळख असलेली ग्रामपंचायत नाही, तर इतर कुठल्याही ग्रामपंचायती सोबत हे गाव जोडण्यात सुद्धा आलेले नाही.त्यामुळे शिक्षण,आरोग्य,पाणी यासारख्या मूलभूत सुविधां पासून कायम वंचित राहण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

आपल्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी किंवा जवळच्या ग्रामपंचायत सोबत गावाला जोडण्यात यावे या करीता ग्रामस्थां कडून शासनस्तरावर अनेकवर्षा पासून प्रयत्न सुरू आहेत.मात्र शासना कडून अद्याप कुठलीच दखल न घेण्यात आल्याचे निषेधार्थ 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

प्रशासनाकडून विदेशीगत वागणूक

गेल्या बाविस वर्षापासून हे गाव प्रशासनाच्या रेकॉर्डवर नाही. ग्रामपंचायतच नसल्याने विविध आयोगाचा निधी या गावाला मिळत नाही. परिणामी गावाचा विकास खूंटला आहे. दरवेळेस प्रशासन ग्रामपंचायतची हमी देते मात्र गावातील नागरीकांना विदेशी नागरीकागत वागणूक मिळत असल्याची भावना येथील नागरीकांनी व्यक्त केली आहे. दर निवडणूकीत नेते येतात आश्वासने देतात मात्र समस्या कोणीच सोडवत नसल्याने ग्रामस्थांनी आता मतदानावरच बहिष्कार घातला आहे.

loading image
go to top