Akola school teacher faces suspension for misconduct.
Sakal
श्रीकांत राऊत
अकोला : आरोपी शिक्षक सुधाकर जानकिराम पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवारी (ता.१२) संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी (ता.११) उघडकीस आली होती. संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे लक्षात घेऊन चान्नी पोलिसांनी आरोपी शिक्षकास ताब्यात घेतले.