esakal | चक्क महिलेने गुंडांना शिकविला धडा; पिस्तूलच हिसकली
sakal

बोलून बातमी शोधा

चक्क महिलेने गुंडांना शिकविला धडा; पिस्तूलच हिसकली

चक्क महिलेने गुंडांना शिकविला धडा; पिस्तूलच हिसकली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ओंकारेश्वर येथून परत येताना पिस्तूल लावून सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांना महिलेने चांगलाच धडा शिकवला. गुंडांना न जुमानता महिलेने पिस्तूल हिसकावून घेतल्याने गुंड फरार झाले. मात्र, ड्रायव्हरने पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. अकोल्यातील चंचल नितीन जोशी यांची समय सूचकता आणि धाडसामुळे गुंड पोलिसांच्या ताब्यात आले. याबद्दल चंचल जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Pistol-Akola-Crime-News-Attempted-theft-nad86)

अंगावर शहारे आणणारी ही घटना अकोला येथील राजस्थानी ब्राह्मण समाजातील नितीन जोशी यांच्यासोबत ओंकारेश्वर जवळ घडली. कुटुंबीयांसोबत ओंकारेश्वर येथून देवदर्शन घेत एमएच-३० झेड-०७६३ या क्रमांकाच्या कारने जोशी कुटुंबीय अकोला येथे परत येत होते. शिवकोठी या गावाजवळ कारच्या मागून आलेल्या दुचाकीवरील युवकांनी चाक पंक्चर झाल्याचे सांगितले.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

तेव्हा शामबिहारी शर्मा यांनी कार थांबविली. नेमकी ही संधी साधून दुचाकीवरील तिघेजण कारजवळ आले आणि पिस्तूल, चाकू व पेचकसचा धाक दाखवून शामबिहारी शर्मा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली.

एकाने नितीन जोशी यांच्या पत्नी चंचल जोशी यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चंचल जोशी यांनी गुंडाच्या हातातील पिस्तूलवर झडप टाकून हिसकली. या प्रकाराने घाबरून जाऊन गुंडांनी मोटारसायकलने पळ काढला. मात्र, तेवढ्याच तातडीने शामबिहारी शर्मा यांनी कार सुरू करून पाठलाग करीत गणेशनगरजवळ दुचाकीला कारने धडक दिली. धडकेमुळे गुंड पडले व मोटारसायकल सोडून पळू लागले.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

तेव्हा जोशी व शर्मा यांनी एकाला पकडले तर दोन जण फरार झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या दर्शनार्थींनी टी.आय. बस स्थानकाजवळ हजर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती दिली. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान जंगलात पळालेल्या दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले. तिघेही आरोपी हरदा येथील असून, या घटनेत जोशी व शर्मा कुटुंबीय सुखरूप आहे.

(Pistol-Akola-Crime-News-Attempted-theft-nad86)

loading image