esakal | नियोजन करा, बाजार समितीला दरवर्षी दोन कोटी देतो-बच्चू कडू
sakal

बोलून बातमी शोधा

नियोजन करा, बाजार समितीला दरवर्षी दोन कोटी देतो-बच्चू कडू

नियोजन करा, बाजार समितीला दरवर्षी दोन कोटी देतो-बच्चू कडू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : थेट निर्यात केंद्रांसोबत बाजार समिती जोडली जावी, चांगल्या कंपन्या बाजार समितीत उतराव्यात म्हणजे बाजार समितीसोबत शेतकऱ्यांचही भलं होईल, त्यासाठी लागणारे नियोजन केल्यास मी डीपीसीतून दरवर्षी दोन कोटी द्यायला तयार आहे, असे भरिव आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले. येथील कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या गोडावून दूकानांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार, ज्येष्ठ सहकार नेते तथा कृउबास सभापती ॲड.भैयासाहेब तिडके अध्यक्षस्थानी होते. (Plan, the market pays the committee two crores every year- Bachchu Kadu)

हेही वाचा: कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?

उपसभापती गणेशराव महल्ले, अप्पू तिडके, राजु कांबे, नरेश विल्लेकर, राम कोरडे, जगदीश मारोटकर, श्रीकृष्ण बोळे, सुनिल पवार, सागर कोरडे, संजय नाईक, बबन डाबेराव, विनायक गुल्हाने, कुमार कांबे, विष्णू लोडम, संतोष इंगोले, दिनकर इसळ, बंडू पाटील लांडे, सर्व कृउबास संचालक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी


सन १८९९ मध्ये कापूस व्यवहार, १९५७ मध्ये धान्यबाजार व १९९३ मध्ये गुरांचा बाजार सुरू करणाऱ्या, १६२ गावे समाविष्ट असणाऱ्या व नविन वर्गवारीत 'अ' वर्गात गेलेल्या या बाजार समितीच्या आजवरच्या शेतकरी कल्याणाच्या ऐतिहासिक कार्याची माहिती ॲड. भैयासाहेब तिडके यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. शेतकरी, खरीददार व इतरांच्या सुविधेसाठी बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंप निर्माणाधीन असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीत त्यांची सोय करून देण्याचा कारभार ही बाजार समिती चालवीत असल्याचेही त्यांनी नमुद केले. सूत्रसंचालन कृउबास संचालक दिवाकर गावंडे यांनी केले.

Plan, the market pays the committee two crores every year- Bachchu Kadu

loading image