esakal | शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी

शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः सफाईच्या मुद्यावरून महानगरपालिका प्रशासनाला सभागृहात चौहू बाजूने घेरण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांकडून झाला. त्यातच नादुरुस्त कचरा उचलगाड्यांवरून शिवसेना संतप्त झाली. गटनेते राजेश मिश्रा थेट सभागृहात गाडी घेवूनच पोहोचल्याने एकच तारांबळ उडाली. (Shiv Sena angry, the bell cart reached the hall of Akola Municipal Corporation)

हेही वाचा: दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स


नाली साफ केल्यानंतर निघालेला कचरा ट्रॅक्टरपर्यंत घेवून जाणाऱ्या दोन चाकी गाड्यांची अ‌वस्था प्रशासनाच्या लक्षात यावी, या हेतूने सभेला प्रारंभ होण्यापूर्वीच राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी ही गाडी सभागृहात आणली. विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी ही गाडी सभागृहात नेमकी कशासाठी आणली? याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. नगरसचिव अनिल बिडवे यांनी ही गाडी सभागृहाबाहेर नेण्याची विनंती केली असता सेनेचे गजानन चव्हाण, राजेश मिश्रा यांनी त्याला विरोध केला. मागील तीन महिन्यापासून नालीतील कचरा उचलणाऱ्या गाड्यांबाबत आयुक्तांना माहिती दिली. गाड्या दुरुस्त होण्या लायक नाहीत, त्यामुळे दुचाकी गाड्या पुरवण्यात याव्यात, अशी मागणी केली.

हेही वाचा: विदर्भातील ४० पालख्यांना हवी वारीची परवानगी

हा गंभीर विषय असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच सभागृहाच्या ही बाब निदर्शनास यावी, यासाठी ही गाडी सभागृहात आणली असल्याचे राजेश मिश्रा म्हणाले. शहराच्या विविध प्रभागात दोन चाकी ४०० गाड्या आहेत. या गाड्यांची हालत खस्ता झाली आहे. काही गाड्या दुरुस्ती लायक नाहीत. त्यामुळेच ५० हजार रुपयात ४०० गाड्या दुरुस्त अथवा नवीन गाड्या तयार होतील का, असा प्रश्न राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला.

Shiv Sena angry, the bell cart reached the hall of Akola Municipal Corporation

loading image