परमबीर सिंग यांच्याविरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे, पोलिस निरीक्षकाच्या 'लेटरबॉम्ब'मुळे खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीर सिंग यांच्याविरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे, पोलिस निरीक्षकाच्या 'लेटरबॉम्ब'मुळे खळबळ

परमबीर सिंग यांच्याविरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे, पोलिस निरीक्षकाच्या 'लेटरबॉम्ब'मुळे खळबळ

अकोला: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पोलिस इन्स्पेक्टरने पोलीस महासंचालकांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली आहे.

विशेष म्हणजे, सिंग यांच्या विरोधातली भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. गेल्या महिन्यात त्यांची मुंबई पोलीस आयुक्त या पदावरुन बदली करण्यात आली होती. पहिली तक्रार मुंबईचे पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी दाखल केली होती. दरम्यान, अकोला पोलिस नियंत्रण कक्षाचे इन्स्पेक्टर बी. आर.घाटगे यांनी पत्राच्या स्वरुपात एक तक्रार २० एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांना दिली असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही जोडून हे पत्र दिलं आहे.

पोलिस महासंचालकांना दिलेल्या या १४ पानी तक्रारीमध्ये घाडगे यांनी सांगितलं आहे की, सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. या पत्रात घाडगे यांनी सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसंच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप सिंग यांच्यावर केला आहे.

सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असून पोलिस ताना घाडगे बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचंही घाडगे यांनी सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना घाडगे म्हणाले, “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन”. मात्र, अद्याप सिंग यांनी यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

संपादन - अथर्व महांकाळ

टॅग्स :Akola