'अत्यावश्‍यक' च्या बहाण्याने बाजारात प्रचंड गर्दी; कडक निर्बंधातही विनाकारण फिरणारे बेफिकीरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अत्यावश्‍यक' च्या बहाण्याने बाजारात प्रचंड गर्दी; कडक निर्बंधातही  विनाकारण फिरणारे बेफिकीरच

'अत्यावश्‍यक' च्या बहाण्याने बाजारात प्रचंड गर्दी; कडक निर्बंधातही विनाकारण फिरणारे बेफिकीरच

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक मेपर्यंत कडक निर्बंध लागू करीत बाजारपेठेची वेळ कमी करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र, रोजच नागरिक अत्यावश्‍यकचा बहाणा करून बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे.

हेही वाचा: शाळेचा गणवेश, पाठीवर बॅग घालून पोलिसांना दिसले युवक; बॅग उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन

यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. याच कालावधीत सर्वाधिक मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. भाजीपाला, किराणा दुकानात सुरक्षित अंतर ठेवल्या जात नाही. विनाकारण फिरणाऱ्यांची "ऑन दि स्पॉट' कोविड टेस्ट काही तालुक्‍यात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मात्र, तरीही विनाकारण फिरणारे बेफिकीर होऊनच वागत आहेत.

अकरा वाजता बाजारपेठ बंद करण्याची वेळ असताना याच वेळी सर्वाधिक गर्दी उसळत आहे. परिणामी मुख्य रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी होताना दिसते. अकराच्या ठोक्‍याला पोलिस वाहनाचा सायरन आवाज करीत ऐकायला मिळतो.

हेही वाचा: सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; प्रात्यक्षिकासाठी शाळेत बोलवण्याचे पुणे रिजनचे आदेश

दुकाने बंद करण्यासह नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन अकरा वाजता करण्यात येते. त्यानंतरही दुपारच्या सुमारास नागरिकांची विनाकारण रस्त्याने ये-जा सुरूच असते. बेफिकीर वागणुकीने आपण दुसऱ्या लाटेला निमंत्रण दिले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत असले तरी नागरिकच हरताळ फासत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

Web Title: People Roaming In Markets On The Name Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Yavatmal
go to top