esakal | शाळेचा गणवेश, पाठीवर बॅग घालून पोलिसांना दिसले युवक; बॅग उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेचा गणवेश, पाठीवर बॅग घालून पोलिसांना दिसले युवक; बॅग उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन

शाळेचा गणवेश, पाठीवर बॅग घालून पोलिसांना दिसले युवक; बॅग उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः शालेय गणवेश, पाठीवर कॉलेज बॅग अडकवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत दोन युवक दारूची तस्करी करीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अटक केली. ऋतिक रुपेश नाईक (वय २०,रा. दाभा) व आशिष मोरेश्वर वाहने (वय ३१ रा. आनंदनगर, कपिलनगर) अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

हेही वाचा: वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

ऋतिक हा विद्यार्थी बनून कॉलेज बॅगमधून दारूची तस्करी करीत असल्याची माहिती यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव, श्रीनिवास दराडे, सहाय्यक उपनिरीक्षक विनोद सोलव, प्रकाश काळे, हवालदार अक्षय सोरदे, दीपक धानोरकर, अरुण चांदने, मधुकर, नरेश मुळक, आफताब, संतोष यादव, विशाल साखरे, किशोर धोटे व विनोद बल्की यांनी सोमवारी दुपारी पोळा मैदान परिसरात सापळा रचला. ऋतिक हा कॉलेज बॅग घेऊन मोटारसायकलने जाताना पोलिसांना दिसला.

हेही वाचा: सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; प्रात्यक्षिकासाठी शाळेत बोलवण्याचे पुणे रिजनचे आदेश

पोलिसांना बघताच ऋतिक याने बाईक जोरात पळविली. पोलिसांनी फिल्मीस्टाइल पाठलाग करून त्याला पकडले. बॅगची पाहणी केली असता त्यामधील कॅनमध्ये ९७ लिटर गावठी दारू आढळली. याचप्रमाणे पोलिसांनी आशिष यालाही दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दोघांविरुद्ध यापूर्वीही दारू तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लॉकडाउन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पोलिस चेक करणार नाही, अशी दोघांची धारणा होती.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top