भंगार साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Steel
SteelSakal

वाशीम - जिल्ह्यात अवैधरीत्या वस्तूची साठेबाजी व विनापरवाना विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र पोलीस प्रशासनाने सुरु केले आहे. त्याच अनुषंगाने धनज बु. हद्दीतील दोनद फाट्यावरील हांडे पॉइंट धाबा येथे अवैधरीत्या लोखंडी सळ्यांची विक्री सुरु असल्याची माहीती पोलीस अधीक्षक यांना मिळाली. यांच्या आदेशाने विशेष पथकामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

मौजे धनज येथील दोनद फाट्या वरील हांडे पॉइंट धाबा येथे अवैधरित्या लोखंडी सळ्या विक्री सुरु असल्याची गोपनीय माहीती मिळताच सपोनि भारत लसंते यांना सदर ठीकाणी धाड टाकून कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिलेत.सदर, ठीकाणी धाड दोनद फाट्यावरील हांडे पॉइंट धाबा येथे टाटा स्टील, सेल, जदाल, टी.एम.टी., ईगल व लोकल भंगार अशा कंपनीचे ठीकिठकाणी लोखंडी सळ्यांचे ढीग व लोखंडी भंगार (अॅगल) आढळून आले. याठीकाणी, विक्रीकरिता लागणारा परवाना, ई-वे चलान व शॉप अक्ट परवाना नसतांनाही शामू रामचंद्र शर्मा वय ३५ वर्ष उत्तर प्रदेश ह.मु.दोनद बु. हा सदर मालाची अवैधरीत्या विक्री करतांना आढळून आला. सदर माल हा नागपूर येथील बदरे आलम अब्दुल सय्यद याचे मालकीचा असून तो बनावट शॉप अक्ट लायसन्स वापरून सदर ठीकाणी अवैधरीत्या लोखंडी साठा या साथीदारांसह विक्री करत असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली.

सदर ठीकाण हे शेतमालक गजानन हांडे यांच्या स्वतः च्या मालकीचे असून त्यांनी शेत सर्व्हे नंबर बनावटीकरण करुन अवैधरीत्या लोखंडी सळ्या विक्री करण्यास भाडेतत्त्वावर देऊन सहकार्य केल. सदर ठीकाणी अंदाजे ६० टन लोखंडी माल अंदाजे किंमत ३५ लाख रुपये अवैधरीत्या साठवून विनापरवाना विक्री करत असल्याचे आढळून आल्याने आरोपी विरुद्ध४६३, ३४ भादंवि नुसार कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सपोनि भारत लसंते, पोहेकॉ विजय तायडे, अमोल कांबळे, राजकुमार यादव, दिपक मुळे यांनी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com