अकोला : उज्ज्वला गॅस जोडणीसाठी आर्थिक लूट

तुलंगा बु. येथील घटना; लाभार्थ्यांनी लावला आरोप

Pradhan Mantri Ujjwala Yojana Financial loot for connection
Pradhan Mantri Ujjwala Yojana Financial loot for connection sakal

वाडेगाव (जि. अकोला) : येथूनच जवळ असलेल्या तुलंगा बु. येथे मागील दोन ते तीन महिन्या आगोदर उज्ज्वला गॅस कनेक्शन घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या गॅस एजन्सीचे प्रतिनिधी गावतील लाभार्थीकडून अर्ज भरून गेले. आता मोफतच्या जोडणीसाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

या योजनेत अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांना गॅस जोडणी मिळाली. परंतु ग्रामीण भागातील गॅस ग्राहकांना योजनेबाबत संपूर्ण माहिती नसल्याने त्यांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याचे चित्र तुलंगा बु. येथे शुक्रवारी पाहायला मिळाले आहे. काही ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच खामगावच्या गॅस एजन्सच्या प्रतिनिधीशी वाद घालून त्याला परत पाठविण्यात आले. (Pradhan Mantri Ujjwala Yojana News)

या गॅस कनेक्शनकरिता खामगाव वरून अकोला जिल्ह्यातील तुलंगा बु. येथे प्रतिनिधी येत असल्याने व जास्त दर आकारल्यामुळे या योजनेपासून अनेक ग्रामस्थ वंचित असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. ही योजना शासन स्तरावरून अगदी मोफत राबविली गेली आहे. परंतु या प्रतिनिधीमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. काही लाभार्थी संबधित गॅस प्रतिनिधी यांच्याशी वाद घालत असताना व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

''खामगाव तालुक्यातील गॅस एजन्सी प्रतिनिधी यांना दिलेल्या गावात न जाता अकोला जिल्ह्यातील तुंलगा बु. येथे अनधिकृतरित्या गॅस विकून जनेतेची फसवणूक करीत आहे. आर्थिक लूट करीत आहेत. वाडेगावातील अधिकृत गॅस एजन्सीकडून नियमानुसार उज्ज्वला गॅस योजना राबविल्या जात आहे.''

- पंकज सहगल, संचालक, इंडेन गॅस, वाडेगाव

''मोफत असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेतील जोडणीसाठी जनतेकडून आर्थिक लूट होत असेल तर संबधित प्रतिनिधी यांच्यावर वरिष्ठ प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.''

- प्रणव तायडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर विधानसभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com