
अकोला : अकोटहून अकोल्याला येत असलेल्या एका गर्भवती महिलेने धावत्या रेल्वेमध्ये एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आरपीएफ जवान आणि रेल्वे प्रवाशांनी माणुसकी दाखवत तातडीने मदत केली. मात्र, ऐनवेळी अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.