Akola News : पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष गाडी नियमित धावणार

गाडीने प्रवास करण्यासाठी लागणारे विशेष भाडे कमी होऊन नियमित तिकीट दरावर प्रवास करता येणार
Pune-Amravati bi-weekly special train will run regularly akola
Pune-Amravati bi-weekly special train will run regularly akolaSakal

अकोला : कोरोना काळात बंद झाल्यानंतर पुन्हा विशेष एक्स्प्रेस म्हणून सुरू करण्यात आलेली पुणे-अमरावती ही द्वि-साप्ताहिक गाडी आता नियमित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या गाडीने प्रवास करण्यासाठी लागणारे विशेष भाडे कमी होऊन नियमित तिकीट दरावर प्रवास करता येणार आहे.

पुणे-अमरावती एक्स्प्रेस मार्गे दौंड, कुर्डुवाडी, लातूर, पूर्णा, अकोला ही विशेष गाडी आतापर्यंत ०१४३९ आणि ०११४४० या क्रमांकाने धावत होती. आता ही गाडी ११४०५ पुणे-अमरावती एक्स्प्रेस या नावाने दर शुक्रवारी आणि रविवारी रात्री १०.५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दर शनिवार आणि सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता अमरावतीला पोहोचेल.

पुणे ते अमरावती दरम्यान तब्बल २० तास २० मिनिटांचा प्रवास. असेल. परतीच्या मार्गात ११४०६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस ही गाडी अमरावती येथून दर शनिवारी आणि सोमवारी रात्री ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, रविवार आणि मंगळवारी पुण्याला दुपारी ४.२० वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गात या गाडीचा प्रवास १८ तास ४० मिनिटे होईल.

सात द्वितीय श्रेणी सामान्य डब्बे

पुणे-अमरावती या द्वि-साप्ताहित गाडीची कोच रचना सामान्य प्रवाशांना लक्षात घेवून करण्यात आली आहे. गाडीत एकूण सात द्वितीय श्रेणी सामान्य डब्बे असतील. याशिवाय नऊ स्लिपर, दोन वातानुकुलित थ्री टियर आणि दोन एसएलआर सह एकूण २० डब्ब्यांसह ही गाडी धावणार आहे.

असा असेल मार्ग

पुणे, उरळी, केडगाव, दौंड, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा आणि अमरावती.

नवीन क्रमांक देऊन नवीन गाडी दाखविण्याचा प्रयत्न

कोरोना काळात बंद करण्यात आलेली अमरावती- पुणे तब्बल २ वर्ष ९ महिन्यानंतर १६ डिसेंबर २०२२ पासून द्वि-साप्ताहिक विशेष भाडे स्पेशल सुरु करण्यात आली. मागील सहा महिन्यात वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. आता नवीन रेल्वे नंबर व एक्सप्रेस भाडे असा बदल करून नवीन रेल्वे सुरु करण्याचा प्रकार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com