esakal | अकोटवरून रोज धावणार रेल्वे!
sakal

बोलून बातमी शोधा

अकोटवरून रोज धावणार रेल्वे!

अकोटवरून रोज धावणार रेल्वे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड (जि. अकोला) ः अकोट-अकोला- पूर्णा आणि पूर्णा-अकोला अकोट ही दररोज धावणारी डेमो ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अकोट-पूर्णा दररोज धावणाऱ्या डेमू ट्रेनचा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादच्या टाईम टेबलमध्ये नांदेड विभागात या गाडीचा समावेश केला आहे. (Railways to run daily from Akot!)


अकोला-अकोट-हिवरखेड-खंडवा या रेल्वे मार्गावरील वाहतूक मागील पाच वर्षापासून बंद आहे. ता.१ जानेवारी २०१७ पासून हा मार्ग गेज परिवर्तन करण्यासाठी बंद करण्यात आला होता. उपरोक्त मार्गांपैकी फक्त अकोला ते अकोट मार्गाचेच गेज कन्वर्जन पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊन दोन वर्ष लोटत आले तरी अकोट येथून प्रवासी रेल्वे अजून पावतो सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, काही लोकप्रतिनिधी, अनेक रेल्वेप्रेमी नागरिकांकडून अकोट येथून रेल्वे सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह


आदर्श पत्रकार संघ हिवरखेड आणि हिवरखेड विकास मंचतर्फे सामाजिक कार्यकर्ते धीरज बजाज संदीप इंगळे, राजेश पांडव, सुरज चौबे, जितेश कारिया, राहुल गिऱ्हे, अर्जुन खिरोडकार, अनिल कवळकार, यांनी निवेदनाद्वारे दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादचे महाप्रबंधक गजानन माल्ल्या यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अकोट येथून रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. शोएब वासेसा, सै रियाज अली, विजय जितकर, गुलाटी, अमोल डोईफोडे, अमोल इंगळे, राकेश भट्ट, प्रकाश नकथमल शर्मा, गजानन राऊत यांचेसह अनेक रेल्वेप्रेमी नागरिक आग्रही होते.

हेही वाचा: फेरफारसाठी लाच मागणारा गायगावचा तलाठी गजाआड


नवीन टाईम टेबल नुसार पूर्णा अकोला-अकोट ही डेमू गाडी दररोज सकाळी सात वाजता पूर्णा येथून निघेल आणि दुपारी पावणे दोन वाजता अकोट येथे पोहोचेल. परतीला दररोज दुपारी दोन वाजता अकोट येथून ही रेल्वे निघेल आणि रात्री साडेआठ वाजता पूर्णा येथे पोहोचेल. या गाडीची धावण्याची वेळ जरी निश्चित झाली असली तरी ही गाडी कोणत्या तारखेपासून सुरू होईल ती तारीख निश्चित झालेली नाही. परंतु येत्या काही दिवसातच ही गाडी धावणार एवढे मात्र निश्चित आहे.

संपादन - विवेक मेतकर

Railways to run daily from Akot!

loading image