पूर्व विदर्भात मुसळधार, पश्चिममध्ये गारपीटीची शक्यता

उत्तर-पूर्वी मॉन्सूनच्या प्रभावामुळे वाढत असलेल्या थंडीचा जोर व मध्य भारतात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता.
Rainy Environment
Rainy EnvironmentSakal
Summary

उत्तर-पूर्वी मॉन्सूनच्या प्रभावामुळे वाढत असलेल्या थंडीचा जोर व मध्य भारतात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता.

अकोला - उत्तर-पूर्वी मॉन्सूनच्या (Monsoon) प्रभावामुळे वाढत असलेल्या थंडीचा (Cold) जोर व मध्य भारतात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे (Environment) पुढील काही दिवस पूर्व व पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस, (Rain) गारपीटीची (Hail) शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.

उत्तर-पूर्व (नॉर्थ-ईस्ट) दिशेकडून बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे सोबत बाष्प घेवून तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस घेवून पोहचतात. याच उत्तर-पूर्वी मॉन्सूनची जमिनीवर वाहणारी शाखा, विशेषता बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा इत्यादी राज्यात थंडी घेवून प्रवेश करतात. त्याच कालावधीत, मध्य भारतात एक प्रकारचा मध्यवर्ती प्रदेश/झोन तयार होतो.

Rainy Environment
देवदर्शनाला जातानाच काळाचा घाला, चौघांचा जागीच मृत्यू

जो मुख्यता अवकाळी पाऊस आणि गारपीट करिता करणीभूत असतो. गत काही दिवसा पासून पश्चिम विक्षोभ सोबत सक्रिय उत्तर-पूर्वी वाऱ्याची दिशा, राज्य आणि शेजारी प्रदेशात, वर नमूद परिस्थिती तयार होताना दिसत आहे. उपग्रह छायाचित्र नुसार पूर्व विदर्भ जोरदार पाऊस तर पश्चिम विदर्भात काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासक संजय अप्तुरकर यांनी वर्तविली आहे. पुढील तीन-चार दिवस वातावरण ढगाळ राहण्याचे संकेत. त्यामुळे विदर्भावरील पाऊस व गारपीटीचे संकट अद्यापही कायम आहे. गत काही दिवसांपासून अनेक ठिकाणी झालेला पाऊस व गारपीटीने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com