देवदर्शनाला जातानाच काळाचा घाला, चौघांचा जागीच मृत्यू | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident
देवदर्शनाला जातानाच काळाचा घाला- चौघांचा जागीच मृत्यू

देवदर्शनाला जातानाच काळाचा घाला, चौघांचा जागीच मृत्यू

अकोट : परतवाडा ते शेगाव प्रवासादरम्यान अकोला जिल्ह्यातील(akola district news) देवरी फाटा ते रौंदळा दरम्यानच्या खड्ड्यांनी(bad roads) चौघांचा बळी(four peoples death) घेतला. ही घटना सोमवार, ता. १० जानेवारी रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर नागरिकांनी रास्ता रोको करून रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत रोष व्यक्त केला.

हेही वाचा: नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश ८१ टक्क्यांवर

परतवाडा येथील चौघेजण कारने शेगावकडे येत असताना हा अपघात घडला. यात चालक अंकुश प्रल्हाद दिवटे हा गाडी मालक वृषभ जयंत जयसिंगपुरे यांची एमएच २७ एआर ९७९६ क्रमांकाची गाडी भाड्याने घेवून इतर तिघांसोबत शेगावला(shegaon) निघाला होता. अकोट शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी फाट्यानजीक त्याची कार झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की वाहनात बसलेल्या चारही जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले चारही व्यक्ती परतवाडा येथिल रहिवासी आहे.

हेही वाचा: रिपाइंचा हात आणि साथ कुणाला? काँग्रेस-भाजप सक्रिय

मृतकांमध्ये घनश्याम चावरे (५७ रा.अमळनेर), आकाश अवधूत कुकडे (२७ रा.परतवाडा), चालक अंकुश प्रल्हाद दिवटे (२७ रा. परतवाडा), अक्षय अशोक अवघड (२८ रा.परतवाडा) यांचा समावेश आहे. वाहन चालक अंकुश दिवटे विरुद्ध दहीहांडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. घटनेची माहिती होताच या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघात इतका भीषण होता की संपूर्ण वाहनाचा चुराडा झाला होता. घटना समजताच दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख घटनास्थळी दाखल होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top