साहेबऽऽ दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही

साहेबऽऽ दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही
SYSTEM
Updated on: 

बाळापूर (जि. अकोला) : दोन दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही साहेब.... अन् घरात झोपता येत नाही..! पुराच्या पाण्यात सर्वस्व गमावलेल्या रिधोरा येथील नागरिकांनी आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्याशी बोलताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. गावा शेजारील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले. त्यामुळे गावातील दोनशे वीस घरे जमीनदोस्त झाली. वीस घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. (Rain-In-Akola-Heavy-rain-Excessive-damage-Guardian-Minister-Bachchu-Kadu-nad86)

शुक्रवारी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रिधोरा येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी व्यथा पालकमंत्र्यांना सांगितली. घराचे छप्पर वाहून गेल्याने नागरिकांना येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण शाळा गळत असल्याने शाळा देखील असुरक्षित असल्याने परिसरात असलेल्या जसनागरा पब्लिक स्कूल काही काळासाठी अधिग्रहित करण्यात यावी व सर्वेक्षण करून सानुग्रह मदत देण्यात यावी असे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

साहेबऽऽ दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही
बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने

पूरग्रस्तांना ब्लॅंकेटची भेट

माजी आमदार बळीराम सिरस्कार, अश्वजीत शिरसाट यांनीही भेट दिली असून, २५ ब्लँकेट पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले. यावेळी धर्मेंद्र दंदी, मंगेश गवई, विशाल दंदी दिनकर वाघ, संजय मुळे, सुनील तायडे, अभिजित गायकवाड उपस्थित होते.

तालुक्यातील एक हजार बत्तीस पूरग्रस्तांना मदत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची व पूरग्रस्त भागाची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. बाळापूर तालुक्यातील १ हजार ३२ नागरिकांना सानुग्रह मदत दिली जाणार आहे. यामध्ये खंडाळा येथील व व्याळा मंडळातील गावांतील नागरिकांना व तालुक्यातील काही गावात ही मदत दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाचे सर्व्हेक्षण सुरू आहे.

साहेबऽऽ दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही
वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल

शेतीचेही मोठे नुकसान

रिधोरा परिसरातील शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असून शेतीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. भाजपचे विलास पोटे यांनी ही मागणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार

येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या असून नागरिकांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. रिधोरा येथील रवी अग्रवाल, मराठा हॉटेलचे मुरलीधर राऊत, पुरुषोत्तम मांगटे, अमोल ठाकरे, संदीप पाटील यांच्याकडून जेवण व किराणा मालाची सोय करण्यात आली.

(Rain-In-Akola-Heavy-rain-Excessive-damage-Guardian-Minister-Bachchu-Kadu-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com